Aarti Badade
झणझणीत, कुरकुरीत आणि मसालेदार चिकन ६५ हा भारतभर प्रसिद्ध स्टार्टर आहे.
ही डिश १९६५ साली तामिळनाडूमधील ‘बुहारी हॉटेल’मध्ये ए.एम. बुहारी यांनी तयार केली होती म्हणूनच तिचं नाव पडलं "चिकन ६५".
"६५" हे वर्ष दर्शवते – डिशचा जन्म 1965 मध्ये झाला. हे डिश तयार झालेलं वर्षच त्याचं नाव बनलं!
काही लोकांचं म्हणणं आहे की डिशमध्ये चिकनचे ६५ तुकडे असायचे, तर काही जण म्हणतात की ६५ दिवस मॅरिनेशन केलं जायचं.
चेन्नईतील एका कॅन्टीनमध्ये सैनिकांना दिल्या जाणाऱ्या मेनूमध्ये ६५ क्रमांकावर ही डिश असायची म्हणून सैनिकांनी तिला ‘चिकन ६५’ म्हणायला सुरुवात केली.
बुहारी हॉटेलमध्ये चिकन ६५ची लोकप्रियता पाहून त्यांनी चिकन ७८, ८२, ९० अशा आवृत्त्याही मेनूत आणल्या!
एका लोकप्रिय आणि चविष्ट डिशमागे इतकी भन्नाट कहाणी आहे. चिकन ६५ या नावातच तीच इतिहास आहे.