Aarti Badade
आपल्या घरात किंवा शाळेत जिथे डास तयार होतात, तिथे चावण्याचा धोका जास्त असतो. मग काय कराल?
डासांपासून वाचण्यासाठी दोन मुख्य गोष्टी करा: स्वतःचे संरक्षण करा आणि डासांची वाढ थांबवा.
प्रत्येक दरवाजा आणि खिडकीला डास प्रतिबंधक जाळी लावा. जाळीला कुठेही छिद्र असल्यास लगेच दुरुस्त करा.
झोपताना पाळणा किंवा पलंग मच्छरदाणीने झाका. ती योग्य मापाची, चौकोनी आणि पांढऱ्या रंगाची असावी.
मच्छरदाणीला १५६ छिद्रे प्रति स्क्वेअर इंच असावीत. ती बिछान्याखाली सहज पोहोचेल इतकी लांब असावी.
जर मच्छरदाणीला कीटकनाशकांचा लेप असेल, तर ती डासांपासून अधिक चांगले संरक्षण देते.
रात्री झोपताना मुलांना फिकट रंगाचे, पूर्ण शरीर झाकणारे कपडे घाला.
डास प्रतिबंधक औषध फक्त हात, पाय, तोंड आणि जखमा सोडून इतर भागावर लावा.
थोडीशी काळजी घेतल्यास तुम्ही डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांपासून सहज वाचू शकता.