तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकतं लिव्हर!

Aarti Badade

शरीराचे पॉवरहाऊस 'लिव्हर'

लिव्हर हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव असून तो रक्तातील विषारी घटक बाहेर काढण्याचे काम करतो. पण आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे याला गंभीर इजा होऊ शकते.

Liver health tips

|

Sakal

अति-तळलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न

जास्त तेलकट, मसालेदार आणि पाकीटबंद (Processed) अन्नाचे सेवन केल्याने लिव्हरवर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे 'फॅटी लिव्हर'चा धोका निर्माण होतो.

Liver health tips

|

Sakal

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे

अनेकदा आपण साध्या डोकेदुखीसाठीही मनाने पेनकिलर्स घेतो. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेली औषधे थेट लिव्हरच्या पेशींना नुकसान पोहोचवू शकतात.

Liver health tips

|

Sakal

कमी पाणी पिणे आणि झोप

शरीर डिटॉक्स करण्यासाठी पाणी आवश्यक आहे. तसेच, रात्री उशिरापर्यंत जागल्याने लिव्हरच्या नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रियेत (Repair process) अडथळा निर्माण होतो.

Liver health tips

|

Sakal

मद्यपान आणि धूम्रपानाचा विळखा

जास्त मद्यपान केल्याने 'लिव्हर सिरोसिस' सारखे जीवघेणे आजार होतात. तसेच धूम्रपानामुळे रक्तातील विषारी द्रव्ये वाढून लिव्हर कॅन्सरचा धोका संभवतो.

Liver health tips

|

Sakal

काय खावे? (लिव्हर फ्रेंडली डाएट)

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळे, मोड आलेली कडधान्ये, लिंबू, आवळा आणि हळद यांचा आवर्जून समावेश करा.

Liver health tips

|

Sakal

७ ते ८ तासांची झोप आणि व्यायाम

लिव्हरला स्वतःला रिचार्ज करण्यासाठी किमान ७ ते ८ तासांच्या शांत झोपेची गरज असते. नियमित व्यायामामुळे लिव्हरमधील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

Liver health tips

|

Sakal

वेळेवर आरोग्य तपासणी

लिव्हरच्या आजारांची लक्षणे सुरुवातीला दिसत नाहीत. त्यामुळे वेळोवेळी 'लिव्हर फंक्शन टेस्ट' (LFT) करून घेणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच सुरक्षित ठरते.

Liver health tips

|

Sakal

डायबेटीज आणि बीपीसाठी 'ही' पाने रामबाण उपाय!

Moringa leaves benefits

|

Sakal

येथे क्लिक करा