Aarti Badade
यकृत हा शरीरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा अवयव असून, तो ५०० पेक्षा अधिक जीवनावश्यक कार्यं करतो. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणे, अन्नाचे पचन, पोषण शोषण, पित्त तयार करणे ही त्याची मुख्य कामे आहेत.
दररोज ६०–११८ मि.ली. पेक्षा जास्त अल्कोहोल घेतल्यास यकृताचे सिरोसिस होऊ शकते. अल्कोहोल हे यकृतासाठी सर्वात घातक आहे.
कीटकनाशकांनी भरलेली फळं व भाज्या हे यकृतासाठी हानिकारक ठरतात. त्यामुळे या अन्नपदार्थांचा योग्यरित्या स्वच्छ धुवून वापर करा.
हिपॅटायटीस A आणि B हे यकृताचे विषाणूजन्य आजार असून, अनेक प्रौढांनी यापासून लसीकरण केलेले नसते. लसीकरण करून घ्या.
अनेक वेळा सप्लिमेंट्स आणि औषधांचे अतिरेकी सेवन यकृतासाठी अपायकारक ठरते. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या.
यकृत कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रित करते आणि पित्त तयार करून चरबीचे पचन करते. त्यामुळे ते योग्यरीत्या कार्यरत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या,फळं व भाज्या नीट धुवा,अल्कोहोल व टॉक्सिन्स टाळा,वेळोवेळी लसीकरण करा,सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.