प्रोटीन सप्लीमेंट घेणे किडनीसाठी सुरक्षित आहे का?

Aarti Badade

प्रोटीन पावडर आणि फिटनेस

आजकाल सगळेच फिटनेस गोल्स आणि प्रोटीन शेकबद्दल बोलतात.अनेक लोक प्रोटीन पावडरला हेल्दी समजून खातात, पण काहीजण याला हानिकारक मानतात.

Sakal

किडनी खराब होण्याचा गैरसमज

अनेक वर्षांपासून लोक मानत आले आहेत की प्रोटीन सप्लीमेंट्स किडनीला खराब करू शकतात.व्हे प्रोटीन (Whey Protein) खरोखरच किडनीला नुकसान पोहोचवते का?

Sakal

तज्ञांनी मिथक तोडले

एम्समधून प्रशिक्षित न्यूरोसर्जन डॉ. अरुण एल. नाइक यांनी हा गैरसमज (Myth) चुकीचा ठरवला आहे.त्यांनी स्पष्ट केले की योग्य प्रमाणात प्रोटीन घेणे सुरक्षित आहे.

Sakal

पालकांचा आणि डॉक्टरांचा सल्ला

जास्त प्रोटीन किडनीसाठी हानिकारक आहे' हा डॉक्टर्स आणि पालकांकडून दिला जाणारा सल्ला पूर्णपणे चुकीचा आहे. ही मोठी गैरसमजूत आहे.

Sakal

सुरक्षित प्रोटीन सेवन

तुम्हाला आधीच किडनीचा गंभीर आजार नसेल, तर प्रोटीन सप्लीमेंट घेतल्याने किडनीला कोणतेही नुकसान होत नाही. योग्य प्रमाणात प्रोटीन घेणे किडनीसाठी सुरक्षित आहे.

Sakal

भारतीयांमध्ये प्रोटीनची कमतरता

गैरसमजूतीपेक्षा भारतीयांमध्ये प्रोटीनची कमतरता ही खरी समस्या आहे.लोकांना अनावश्यक भीतीमुळे शरीरासाठी आवश्यक प्रोटीन मिळत नाही.

Sakal

प्रोटीन कमी खाण्याचे धोके

प्रोटीन कमी खाल्ल्यास शरीरात चरबी वाढते, इन्सुलिन व्यवस्थित काम करत नाही आणि सूज (Inflammation) राहते. ही स्थिती पुढे जाऊन हृदयाचे आजार आणि स्ट्रोकचे कारण बनू शकते.

Sakal

कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती सोडा! हे 5 पदार्थ खायला सुरवात करा

Sakal

येथे क्लिक करा