पुजा बोनकिले
प्रोटीन शेक जीमला जाणाऱ्या लोकांसाठी लोकप्रिय आहे.
काही लोकांना दूधात तर काहींना पाण्यात प्रोटीन पावडर घ्यायला आवडते.
गाईच्या दूधात असलेल्या ८०% प्रथिनाला केसीन म्हणतात. जे स्नायूंच्या निर्मितीसाठी आवश्यक असते.ते अमिनो आम्लांचा एक चांगला स्त्रोत आहे. विशेष म्हणजे शरीर स्वत:हून अमिनो आम्ल बनवू शकत नाही.
केसीन हळूहळी पचते. जे शीरारला स्नायू बनवणारे अमीनो आम्ल दूर्घकाळ पोहोचवत राहते. म्हणजेच जर तुम्ही दूधासोबत प्रोटीन शेक प्यायाला तर ते हळूहळू पचते.
२०२० मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार जर तुम्ही झोपण्यापूर्वी ३० मिनिटे ४० ग्रॅण केसीन घेतले तर रात्रभर स्नायू दुरुस्त करते, सूज कमी करणे आणि वेदनांपासून आराम देते.
काही डॉक्टरांच्या मते दूध आणि प्रोटीन शेक पिणे टाळले पाहिजे. ज्यांना पोटाचा त्रास आहे.
वजन कमी करायचे असेल तर दूधासोबत प्रोटीन घ्यावे पण पचनाच्या समस्या असतील आणि वजन कमी करायचे असेल तर पाण्यासोबत प्रोटीन घ्यावे.