Protein-Rich Breakfast: रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा प्रोटीनने भरलेले हे पदार्थ

Monika Shinde

सोया भुर्जी

सोया चंक्स उकडून कुस्करून घ्या व कांदा-टोमॅटोसोबत परतून घ्या. अंड्याला चांगला शाकाहारी पर्याय.

Healthy Morning Breakfast

|

esakal

डाळीचा चिला

हरभरा डाळ किंवा मूग डाळ भिजवून वाटून घ्या. त्यात जिरे कांदा, कोथिंबीर घालून झटपट चिले बनवा. याने तुमचं पोट देखील भरत आणि दिवसभर ऍक्टिव्ह हि राहता.

Healthy Morning Breakfast

|

esakal

राजमा किंवा चणे उसळ

आधी शिजवलेले राजमा किंवा चणे कांदा-मसाल्यासोबत परतून घ्या. दोन दिवस टिकणारा नाश्त्याचा पर्याय.

Healthy Morning Breakfast

|

esakal

ओट्स व दह्याचा नाश्ता

ओट्स शिजवून त्यात घट्ट दही, शेंगदाणे व थोडे मीठ घाला. हलका पण प्रथिनयुक्त नाश्ता.

Healthy Morning Breakfast

|

esakal

टोफू पराठा किंवा भाजी

टोफू कुस्करून मसाल्यासोबत परतून घ्या किंवा पराठ्यात भरा. कमी फॅट आणि जास्त प्रथिने.

Healthy Morning Breakfast

|

esakal

चिकन सॅंडविच (ग्रिल्ड)

ग्रिल्ड चिकनचे तुकडे गव्हाच्या ब्रेडमध्ये घालून सॅंडविच तयार करा. प्रथिनांचा उत्तम स्रोत.

Healthy Morning Breakfast

|

esakal

दूध व प्रथिनयुक्त लाडू

शेंगदाणे, डाळी व गूळ वापरून घरचे लाडू बनवा. सकाळी दूधासोबत घ्या वेळही वाचतो.

Healthy Morning Breakfast

|

esakal

हॉटेल आणि ढाब्यांवर जेवणानंतर बडीशेप का दिली जाते? जाणून घ्या यामागचं कारण

येथे क्लिक करा