Monika Shinde
सर्व हॉटेल, ढाबा आणि रेस्टॉरंटमध्ये जेवणानंतर बडीशेप दिले जाते. हे खाल्ल्याने फक्त आपल्या तोंडाला चव देत नाही तर हे आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊयात याचे आरोग्यदायी फायदे कोण कोणते आहेत.
benefits of badisheyp
esakal
बडीशेपमध्ये असे घटक असतात जे पचनसंस्थेला सक्रिय करतात. जेवणानंतर ती चघळल्यास अन्न लवकर आणि नीट पचायला मदत होते. त्यामुळे पोटावर ताण कमी येतो.
benefits of badisheyp
esakal
भारी, मसालेदार किंवा तेलकट जेवणानंतर अनेकदा गॅसचा त्रास होतो. बडीशेपमधील नैसर्गिक तेल पोटातील वायू कमी करण्यास मदत करतात, त्यामुळे हलकेपणा जाणवतो.
benefits of badisheyp
esakal
जेवणानंतर येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी बडीशेप फार उपयोगी आहे. ती नैसर्गिक माउथ फ्रेशनरप्रमाणे काम करते आणि श्वासाला ताजेपणा देते.
benefits of badisheyp
esakal
बडीशेप पोटातील आम्लाचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे अॅसिडिटी, छातीत जळजळ किंवा पोटात आग होणं कमी होतं.
benefits of badisheyp
esakal
बडीशेप चघळल्यावर लाळेचा स्त्राव वाढतो. लाळेमुळे अन्नाचे विघटन सोपं होतं आणि पचनप्रक्रिया अधिक प्रभावीपणे पार पडते.
benefits of badisheyp
esakal
दररोज मर्यादित प्रमाणात बडीशेप खाल्ल्यास पचनसंस्था मजबूत राहते. यासोबतच तोंडाचं आरोग्य आणि एकूणच पोटाचं स्वास्थ्य चांगलं राहण्यास मदत होते.
benefits of badisheyp
esakal
Early Cancer Symptoms
esakal