Anushka Tapshalkar
भोपळ्याच्या बियांपासून तयार केलेलं तेल (Pumpkin Seed Oil) केस गळती, केस पातळ होणे आणि टक्कल पडणे कमी करण्यात मदत करतं. यात असलेले झिंक, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स केसांना मुळापासून बळकट करतात.
hair fall
sakal
हे तेल DHT (dihydrotestosterone) नावाच्या हार्मोनला रोखतं, जो केस गळतीचं एक प्रमुख कारण असतं. त्यामुळे केस नैसर्गिकरीत्या वाढतात आणि जाड, दाट दिसतात.
दोन चमचे भोपळ्याच्या बियांचं तेल किंचित गरम करून 10–15 मिनिटं सौम्यपणे टाळूवर मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारून केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचतं. आठवड्यातून दोनदा केल्यास काही महिन्यांत परिणाम दिसून येईल.
hair massage
भोपळ्याच्या बियांच्या तेलात अॅलोवेरा जेल किंवा नारळ तेल मिसळा आणि केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा. गरम टॉवेलने झाका आणि 30–40 मिनिटांनंतर धुवा. यामुळे केस मऊ, चमकदार आणि मजबूत होतील.
तुमचं आवडतं नारळ, बदाम किंवा कॅस्टर ऑइल वापरत असाल, तर त्यात काही थेंब भोपळ्याच्या बियांच्या तेलाचे घाला. यामुळे केसांच्या वाढीसाठी त्याचं गुणधर्म वाढतात
hair oils
वेळ नसल्यास 5–6 थेंब कद्दू तेल शॅम्पू किंवा कंडिशनरमध्ये मिसळा. दरवेळी केस धुताना टाळूला पोषण मिळेल.
mix with shampoo or conditioner
हे तेल हलकं, नॉन-स्टिकी आणि सर्व प्रकारच्या केसांसाठी योग्य आहे. कोरडे, रंगवलेले किंवा पातळ केस असणाऱ्यांसाठी हे नैसर्गिक उपाय अतिशय प्रभावी ठरतं.
light weight, non sticky
Natural Glowing Skin with Rice Flour Face Pack
sakal