छोट्या बियांमध्ये लपलाय मोठा आरोग्यखजिना, तुम्हीही खाताय का 'या' बिया?

सकाळ डिजिटल टीम

भोपळ्याच्या बियांचे आश्चर्यकारक फायदे

आपल्या आहारात बियाण्यांना विशेष स्थान आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे भोपळ्याच्या बिया. पोषणतत्त्वांनी समृद्ध असलेल्या या बिया शरीराला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया, दररोज मूठभर भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास शरीराला कोणते फायदे मिळतात.

Pumpkin Seeds Benefits | esakal

भोपळ्याच्या बियांतील पोषक घटक

भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने, फायबर, झिंक, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन K, व्हिटॅमिन E, ओमेगा-३ व ओमेगा-६ फॅटी अॅसिड, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. हे घटक शरीराला ताकद देतात आणि अनेक रोगांपासून बचाव करतात.

Pumpkin Seeds Benefits | esakal

हृदयासाठी फायदेशीर

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी भोपळ्याच्या बिया हृदयाचे आरोग्य सुधारतात. त्यातील पोटॅशियम हृदयाची कार्यक्षमता चांगली ठेवते आणि रक्तदाब संतुलित ठेवतो.

Pumpkin Seeds Benefits | esakal

हाडे होतील मजबूत

भोपळ्याच्या बिया कॅल्शियम व मॅग्नेशियमचे उत्तम स्रोत आहेत. त्यामुळे दररोज मूठभर या बियांचे सेवन केल्यास हाडे मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्यांपासून बचाव होतो.

Pumpkin Seeds Benefits | esakal

अशक्तपणावर उपाय

ज्यांना वारंवार थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो त्यांनी भोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश करावा. यात मुबलक प्रमाणात लोह असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

Pumpkin Seeds Benefits | esakal

पचन सुधारेल

दररोज भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास पचन सुधारते. त्यातील फायबर पोट स्वच्छ ठेवते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.

Pumpkin Seeds Benefits | esakal

त्वचेच्या समस्यांवर उपाय

भोपळ्याच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन E असल्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. यामुळे सुरकुत्या, कोरडी त्वचा आणि इतर समस्यांवर मात करता येते.

Pumpkin Seeds Benefits | esakal

भोपळ्याच्या बियांचे गुपित जाणून घ्या

दररोज मूठभर भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहते, हृदयाचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत होतात, पचन सुधारते आणि त्वचेला नैसर्गिक तेज मिळते.

Pumpkin Seeds Benefits | esakal

Grape leaves Benefits : 'ही' छोटीशी पानं तुमची नजर, ताकद आणि आयुष्य वाढवू शकतात! जाणून घ्या कोणती?

Grape leaves Benefits | esakal
येथे क्लिक करा...