सकाळ डिजिटल टीम
'मधुमेह' हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये शरीरातील साखरेची पातळी खूप वाढते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर ठरू शकतात.
भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर, झिंक, प्रथिने आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.
भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास आणि शरीरात ग्लुकोजचा योग्य वापर करण्यास मदत करते.
या बियांमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात, जे शरीरातील इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारतात आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात.
भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने आणि मॅग्नेशियम असते, जे हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करते.
भोपळ्याच्या बियांमध्ये कार्बोहायड्रेट आणि साखरेचे प्रमाण खूप कमी असते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी योग्य आहे.
तुम्ही भोपळ्याच्या बिया तव्यावर हलक्या भाजून किंवा त्याची पावडर बनवून कोमट पाण्यासोबत पिऊन खाऊ शकता. दररोज फक्त 30-40 ग्रॅम भोपळ्याच्या बिया खा.