कोका कोलापेक्षाही जुनं आहे पुण्याचं शीत पेय! असं आहे इराण कनेक्शन

Yashwant Kshirsagar

शीतपेयाचा गौरवशाली वारसा!

अमेरिकेतील कोका-कोला (१८८६) सुरू होण्याच्या दोन वर्ष आधी, १८८४ मध्ये पुण्यात अर्देशीर अँड सन्स कंपनीची सुरुवात झाली. आज १३६ वर्षांनंतरही ही कंपनी अस्तित्वात आहे आणि भारतातील (कदाचित जगातील) सर्वात जुने शीतपेय आहे!

Ardeshir Soda Pune's Heritage Drink

|

esakal

इराण कनेक्शन

१८६५ मध्ये इराणातील यझद प्रांतातून धार्मिक छळ टाळण्यासाठी अर्देशीर खोदादाद इराणी भारतात आले. मुंबईत बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला, पण पुण्याच्या कॅम्प एरियात स्थायिक झाले.

Ardeshir Soda Pune's Heritage Drink

|

esakal

ब्रिटिश सैनिकांचे आवडते पेय!

पुण्याच्या कॅम्प एरियात ब्रिटिश सैनिक दारूसोबत फसफसणारे कार्बनेटेड सोडा पाणी जास्त आवडीने पितात, हे लक्षात आले. तेव्हा भारतात तयार बाटलीबंद सोडा मिळत नव्हता.

Ardeshir Soda Pune's Heritage Drink

|

esakal

सोडा बनवण्याची अनोखी पद्धत

कोळसे जाळून कार्बन डायऑक्साइड वायू तयार करून, फिल्टर करून घरातच सोडा बनवला. हे ज्ञान कसे मिळवले कोण जाणे, पण ब्रिटिश सैनिकांना एकदम आवडला!

Ardeshir Soda Pune's Heritage Drink

|

esakal

सरबतवाला चौकाची ओळख

मागणी वाढल्यावर गफ्फार बेग रस्त्यावर पारशी सेठना कुटुंबाच्या मोठ्या जागेत उद्योग हलवला. त्या चौकाला आजही ‘सरबतवाला चौक’ म्हणतात. कंपनी इथूनच चालते!

Ardeshir Soda Pune's Heritage Drink

|

esakal

इराणी हॉटेल्सचा वारसा

१९-२०व्या शतकात इराणी पारशीं लोकांनी पुणे-मुंबईत कॅफे नाझ, येझदान, ब्रिटानिया, कयानी सारखी हॉटेल्स सुरू केली. त्यातच अर्देशीर सोडा सर्वत्र प्रसिद्ध होता.

Ardeshir Soda Pune's Heritage Drink

|

esakal

कुटुंबातील संघर्ष

अस्सल पारशी स्वभावाप्रमाणे मुलगा फ्रामजीबरोबर बापाचे पटले नाही. फ्रामजीने स्वतंत्र ‘फ्राम्स’ कंपनी सुरू केली जी नंतर बंद झाली. पण आजोबांचा उद्योग नातू गिलानी इराणीने सांभाळला.

Ardeshir Soda Pune's Heritage Drink

|

esakal

आजची चौथी पिढी

आज ४८ वर्षीय मरझबान इराणी हे चौथी पिढीतील असून कंपनी सांभाळत आहेत. छोटेखानी पण १३६ वर्ष जुना हा पुण्याचा वारसा आजही जिवंत आहे!

Ardeshir Soda Pune's Heritage Drink

|

esakal

सोडा कुठे मिळतो?

फक्त जुनी पारशी-इराणी हॉटेल्समध्ये (दोराबजी, जॉर्ज, रुस्तमस, कॅफे याझदान, ब्ल्यू नाईल) हा सोडा मिळतो बाजारात किंवा रिटेल दुकानात नाही. काचेच्या बाटलीत मिळत तो त्यासाठी १० रुपये डिपॉझिट घेतले जाते!

Ardeshir Soda Pune's Heritage Drink

|

esakal

दहा अनोख्या चवी

साधा सोडा, आइसक्रीम सोडा , ग्रीन ऍपल, पीच, पाइनॲपल, ऑरेंज, लेमन, जीरा मसाला, जिंजर सोडा आणि सर्वात खास – फक्त पारशी हॉटेल्समध्ये मिळणारी रास्पबेरी असे अनेक चवीचा सोडा मिळतो.

Ardeshir Soda Pune's Heritage Drink

|

esakal

इराणची मुघलांना युद्धात व्हायची मदत, अफगाणिस्तानमार्गे पाठवल्या जायच्या 'या' वस्तू

Mughal Iran Relations 

|

esakal

येथे क्लिक करा