Aarti Badade
पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर असलेले चतु:श्रृंगी देवीचे मंदिर हे श्रद्धा, इतिहास आणि परंपरेचा अनोखा संगम मानले जाते.
Chaturshringi Temple Pune
Sakal
चतु:श्रृंगी देवीच्या मंदिराचा इतिहास पेशवेकाळाशी जोडला जातो आणि उपलब्ध माहितीनुसार हे मंदिर सुमारे २४० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.
Chaturshringi Temple Pune
Sakal
पेशव्यांचे सावकार आणि टांकसाळीचे मालक दुर्लभशेट पितांबरदास महाजन हे वणीच्या सप्तशृंगी देवीचे निस्सीम भक्त होते.
Chaturshringi Temple Pune
Sakal
वृद्धापकाळामुळे वणीला जाणे शक्य होत नसल्याने महाजन दुःखी होते, तेव्हा देवीने त्यांना स्वप्नात दृष्टांत देऊन पुण्यातील टेकडीवर उत्खनन करण्यास सांगितल्याची आख्यायिका आहे.
Chaturshringi Temple Pune
Sakal
देवीच्या दृष्टांतानुसार उत्खनन केल्यानंतर महाजनांना देवीची मूर्ती सापडली आणि त्यांनी त्या ठिकाणी चतु:श्रृंगी देवीचे मंदिर उभारल्याचे सांगितले जाते.
Chaturshringi Temple Pune
Sakal
‘चतुर’ म्हणजे चार आणि ‘श्रृंगी’ म्हणजे शिखरे असा या नावाचा अर्थ सांगितला जातो, त्यामुळे चार शिखरांशी या मंदिराच्या नावाचा संबंध जोडला जातो.
Chaturshringi Temple Pune
Sakal
टेकडीवर वसलेल्या या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी अनेक पायऱ्या चढाव्या लागतात आणि मंदिर परिसरात गणपतीचे मंदिरही आहे.
Chaturshringi Temple Pune
Sakal
मंदिर परिसरातील पार्वतीनंदन गणपती मंदिरात चाफेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकारी रँडच्या वधाचा कट रचल्याचा उल्लेख काही ऐतिहासिक लेखांमध्ये आढळतो.
Chaturshringi Temple Pune
Sakal
नवरात्रोत्सवात चतु:श्रृंगी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात आणि या काळात मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळते.
Chaturshringi Temple Pune
Sakal
चतु:श्रृंगी देवीचे मंदिर हे पुण्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा महत्त्वाचा भाग असून त्यामागील आख्यायिका आणि ऐतिहासिक संदर्भ आजही अनेकांना आकर्षित करतात.
Chaturshringi Temple Pune
Sakal
Ajinkyatara Fort History age
Sakal