पुण्यात पुन्हा थंडीची लाट! गारठा आणखी किती दिवस?

संतोष कानडे

पुणे

मागच्या तीन दिवसांपासून पुणे शहराचं तापमान दोन अंकांवरुन एका अंकांवर कोसळलं आहे.

तापमान

गुरुवारी किमान तापमानामध्ये मोठी घट नोंदविण्यात आली आहे. तर पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

किमान तापमान

काही दिवसांपूर्वी किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले होते. मात्र यामध्ये साधारण पाच अंश सेल्सिअसची घट झाली आहे.

कमाल तापमान

गुरुवारी किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.

गारवा

त्यामुळे पुणे आणि परिसरात सकाळी आणि संध्याकाळी गारवा जाणवत आहे. मात्र दुपारी कडक ऊन आणि उकाडा जाणवत आहे.

हवामान स्थिर

पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

विरळ धुके

आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असून, सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे, तर रविवारपासून कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

सेल्सिअस

कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त पर्यटनस्थळं

<strong>येथे क्लिक करा</strong>