पुजा बोनकिले
दिवाळी म्हटल की फटाके आलेच...पण या फटाक्यांमुळे लहान मुलांपासून घरातील आजी आजोबांना त्रास होतोच शिवाय ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढते.
हेच टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही नियम जारी करण्यात आले आहेत.
पुणे पोलिसांनी ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत पूर्णपणे बंदी घातली आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी २० ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर फटाके विकणाऱ्यांना तात्पुरते परवाने दिले जाणार आहेत
रूग्णालय ,शैक्षणिक संस्था, न्यायालयांच्या परिसरापासून १०० मीटरच्या आत कोणत्या प्रकारच्या फटाक्यांचा वापर करण्यास मनाई आहे. तसेच कोणत्याही रस्त्यावर, पुलावर, घाट किंवा सेतूजवळ फटाके फोडण्यास मनाई आहे.
फटाक्यांचा आवाज १२४ डेसिबल पेक्षा जास्त नसावे.
१०० पेक्षा जास्त फटाके असलेल्या साखळी फाटकांच्या उत्पादन, विक्री आणि वापरण्यावर बंदी
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
Diwali 2025:
Sakal