Mayur Ratnaparkhe
श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून निघाली आहे. सकाळी ९.३० वाजता आरती झाल्यानंतर बेलबाग चौकातून मिरवणूक मार्गस्थ झाली.
Kasba ganpati
esakal
श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूकही पारंपरिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून निघाली आहे. अब्दागिरी, मानचिन्हांसह गणराय विराजमान असलेली ही चांदीची पालखी कार्यकर्ते आपल्या खांद्यावरून नेत आहेत.
Tambdi Jogeshwari Ganpati Mandal
esakal
स्वप्नील आणि सुभाष सरपाले यांनी तयार केलेल्या ‘हर हर महादेव’ या फुलांच्या आकर्षक रथातून श्री गुरुजी तालीम मंडळाच्या गणरायाची मिरवणूक निघाली आहे. या मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन होत आहे.
Guruji Talim Ganpati Mandal
esakal
श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या १२५ व्या वर्षीच्या गणेशोत्सवाची सांगता मयूर रथातून निघणाऱ्या मिरवणुकीने होत आहे. मयूर रथावर फुलांची सजावट करण्यात येणार असून या रथामध्ये हायड्रोलिक पद्धतीचा वापर केला जाणारा आहे.
Tulshibag Ganpati mandal
esakal
केसरीवाडा मिरवणुकीत श्रीराम, शिवमुद्रा, स्वराज्य ट्रस्ट ढोल-ताशा पथकांचा समावेश असणार आहे. बिडवे बंधूंचे नगारा वादन, इतिहासप्रेमी मंडळाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधी जीर्णोद्धार’ हा देखावा असणार आहे.
kesariwada Ganpati
esakal
सलग तिसऱ्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दुपारी चार वाजता बेलबाग चौकातून मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे. दगडूशेठ हलवाई गणपती यंदा श्री गणनायक रथामध्ये विराजमान होणार आहेत. आकर्षक विद्युत रोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे.
Shrimant Dagdushet Halwai
esakal
अखिल मंडई मंडळाची सांगता मिरवणूक सायंकाळी सहा वाजता निघणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी ‘श्री गणेश सुवर्णयान’ हा रथ साकारला आहे. श्री गणेश सुवर्णयानाचे स्वरूप जहाजासारखे असून रथाचा आकार २५ फूट लांब आणि १६ फूट रुंद असा आहे.
Akhil Mandai Ganpati mandal
esakal
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या विसर्जन मिरवणुकीला सायंकाळी सहा वाजता सुरुवात होईल. मंडळाच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक आकर्षक पद्धतीने सजविलेल्या ‘श्री गणेश रत्न रथा’तून निघणार आहे.
Bhausaheb Rangari Ganesh mandal
esakal