जगात फेमस झालीय पुण्यातील गवताळ सफारी,'या' दुर्गम गावात थेट अमेरिकेतून येतात पर्यटक

Yashwant Kshirsagar

पुणे पर्यटन

पुणे जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक आणि तसेच निसर्गाने नटललेली पर्यटनस्थळे देशभरात प्रसिद्ध आहेत. लाखो पर्यटक येथे भेट देत असतात.

Pune Indapur Grassland safari

|

esakal

दुर्लक्षित गाव

पण इंदापूर तालुक्यातील एक दुर्गम गाव मात्र आता जगात फेमस झाले आहे. या गावात देश-विदेशातून पर्यटक भेटी देत असतात.

Pune Indapur Grassland safari

|

esakal

विनविभागाचा प्रकल्प

इंदापूर तालुक्यात कडबनवाडी या गावात स्वातंत्र्यानंतर अद्याप ही एसटी न पोहोचलेली नाही, पण विन विभागाच्या गवताळ सफारी प्रकल्पामुळे हे गाव थेट जगाच्या नकाशावर पोहोचले

Pune Indapur Grassland safari

|

esakal

गवताळ सफारी प्रकल्प

या भागातील जैवविविधतेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी २१ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्रातील पहिला 'गवताळ सफारी प्रकल्प' येथे सुरू केला.

Pune Indapur Grassland safari

|

esakal

वन सफारी

अल्पावधीत ऑनलाइन बुकिंगाच्या माध्यमातून देशी विदेशी पर्यटकांच्या येथे सहा हजार वन सफारी झाल्या असून सुमारे २७ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

Pune Indapur Grassland safari

|

esakal

विदेशी पर्यटक

आता पर्यंत २० हजार पर्यटकांनी भेट दिली असून असून ५०० विदेशी पर्यटकांमध्ये अमेरिका, रशिया, हाँगकाँग, जर्मनी, इटली येथील पर्यटकांचा देखील समावेश आहे.

Pune Indapur Grassland safari

|

esakal

सफारीचा मार्ग

सफारीचा मार्ग ३० किलोमीटरचा असून वेळ सकाळी ६ ते १२ व सायंकाळी ३ ते ६ अशी ठेवण्यात आली आहे.

Pune Indapur Grassland safari

|

esakal

पक्षी -प्राण्यांचे दर्शन

सुमारे ३५०० हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या वनक्षेत्रात उघड्या जिप्सीमधून चिंकारांचा कळप, तरस, ससा, कोल्हा, लांडगे, खोकड असे १५ पेक्षा अधिक प्राणी तसेच १०० पेक्षा अधिक स्थानिक प्रजातीचे पक्षी पाहता येतात.

Pune Indapur Grassland safari

|

esakal

हनिमूनसाठी गोवा अन् काश्मीर कशाला? कोकणात 'या' ५ ठिकाणी कमी बजेटमध्ये अनुभवा स्वर्गसुख

Budget Honeymoon Places in Konkan

|

esakal

येथे क्लिक करा