Anushka Tapshalkar
३ नोव्हेंबरला हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या 'पिंक लाईन'चे उद्घाटन झाले. ४ नोव्हेंबरपासून या मार्गावरील २३ पैकी १७ स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू होणार आहे. त्यानिमित्ताने इतर मार्गिका जाणून घेऊया.
Pune Metro Line 3
sakal
ही मार्गिका पुण्याच्या उत्तर आणि दक्षिण भागाला जोडते. या मार्गावर पीसीएमसी, भोसरी, खडकी, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, मंडई आणि स्वारगेट ही प्रमुख स्थानके आहेत.
Purple Line
sakal
ही मार्गिका पिंपरी-चिंचवडला शिवाजीनगर आणि स्वारगेटशी थेट जोडते. भूमिगत प्रवासामुळे दाट लोकवस्तीच्या भागांनाही मेट्रोचा सोयीस्कर पर्याय मिळाला आहे.
Purple Line
sakal
वनाज ते रामवाडी ही मार्गिका पुण्याच्या पूर्व व पश्चिम भागांना जोडते. कोथरूड, डेक्कन, पुणे स्टेशन, रुबी हॉल, कल्याणीनगर आणि रामवाडी ही यावरील प्रमुख ठिकाणे आहेत.
Aqua Line
sakal
अॅक्वा लाईनमुळे कोथरूड ते पूर्व पुण्यातील IT क्षेत्राचा प्रवास सुलभ झाला आहे. स्थानकांच्या रचनेत संस्कृती जपली असून मंगळवार पेठ स्थानकाला 'मावळ्यांच्या पगडी'चा आकार दिला आहे.
Aqua Line
sakal
माण-हिंजवडी ते जिल्हा न्यायालय (शिवाजीनगर) हा २३.२ किमीचा संपूर्ण मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) असून यावर २३ स्थानके आहेत.
हिंजवडी, वाकड, बालेवाडी आणि शिवाजीनगरला जोडणारा हा मार्ग दैनंदिन वाहतूक कोंडी कमी करेल. विशेष म्हणजे, हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर उभारला आहे.
Pink Line
sakal
Tata EV
Esakal