पुणे मनपाचं ब्रीदवाक्य माहितीये का? विद्यानंद बापट यांच्या उल्लेखानंतर आलं चर्चेत!

Shubham Banubakode

पुणे मनपाची स्थापना

पुणे महानगरपालिकेची स्थापना १५ फेब्रुवारी १९५० रोजी झाली. वाढती लोकसंख्या आणि नागरी सुविधांची गरज लक्षात घेऊन ही स्थापना करण्यात आली.

Pune Municipal Corporation slogan

|

esakal

ब्रीद वाक्याचा अर्थ

“वरं जनहितं ध्येयम्‌” हे पुणे मनपाचं ब्रीदवाक्य आहे. ‘वरं’ म्हणजे सर्वोच्च, ‘जनहितं’ म्हणजे लोकांचं कल्याण आणि ‘ध्येयम्‌’ म्हणजे मुख्य उद्दिष्ट किंवा कर्तव्य.

Pune Municipal Corporation slogan

|

esakal

लोकांचं कल्याण

एकूणच “लोकांचे कल्याण (जनहित) हेच अंतिम ध्येय किंवा उद्दिष्ट आहे” असा त्याचा साधा अर्थ आहे.

Pune Municipal Corporation slogan

|

esakal

डीजेचा वाद

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजावरून मोठा वाद सुरू आहे. विद्यानंद बापट यांनी हा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे.

Pune Municipal Corporation slogan

|

esakal

चर्चेत कसं आलं ब्रीदवाक्य?

एका मुलाखतीत विद्यानंद बापट यांनी पुणे मनपाच्या ब्रीदवाक्याचा उल्लेख केला. त्यानंतर हे ब्रीदवाक्य पुन्हा चर्चेत आलं.

Pune Municipal Corporation slogan

|

esakal

प्रशासनापुढची मोठी आव्हानं

पुण्यात पाणी, वाहतूक, कचरा, पर्यावरण आणि घरांचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतो आहे. या सगळ्याची जबाबदारी मनपा प्रशासनावर आहे.

Pune Municipal Corporation slogan

|

esakal

कारभार नेमका कोण चालवतं?

पुण्यात महापौर शहराचे प्रथम नागरिक असतात; मात्र प्रशासकीय अधिकार आयुक्तांकडे असतात. नगरसेवक, समित्या आणि अधिकारी मिळून शहराचा कारभार चालवतात.

Pune Municipal Corporation slogan

|

esakal

या मुघल बादशहाने गादीवर बसताच दान केली होती लाखो बीघा जमीन

Shah Jahan and Mumtaz Mahal

|

esakal

हेही वाचा -