सकाळ वृत्तसेवा
पुण्यातल्या बुधवार पेठेचा इतिहास तसा रंजक आहे. महाराष्ट्रभर या भागाची ओळख रेड लाईट एरिया म्हणून आहे
परंतु बुधवार पेठेमध्ये अनेक मंदिरं, पुस्तकांची बाजारपेठ आणि नामांकित कंपन्यांची कार्यालयं आहेत.
बुधवार पेठेतला काही भाग रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जातो, त्याला ब्रिटिश कारणीभूत आहेत.
साधारण सव्वादोनशे वर्षांपूर्वी पेशव्यांच्या काळामध्ये या भागाला बुधवार पेठ असं नाव मिळालं.
औरंगजेबानंतर सतराव्या शतकामध्ये १७३० साली थोरले बाजीराव पेशवे पुण्यामध्ये कायमचे मुक्कामी आले.
थोरल्या बाजीराव पेशव्यांनी व्यापाराला उत्तेजन देण्यासाठी पुण्यात नवीन पेठा स्थापन केल्या.
या भागाचं पूर्वीचं नाव बदलून त्यांनी बुधवार पेठ केलं आणि उद्योग-धंद्यांना चालना दिली.
पेशव्यांच्या काळात सुरुवातीला बुधवार पेठेमध्ये केवळ धान्याचा बाजार भरायचा. याच भागात कलावंतीनींच्या नृत्याचे कार्यक्रम होत असत.
पेशव्यानंतर ब्रिटिशांच्या काळामध्ये बुधवार पेठमध्ये हळूहळू रेड लाईट एरिया तयार झाला. तसं करण्यात इंग्रज कारणीभूत आहेत, असं इतिहासकार सांगतात.