Sandip Kapde
भुलेश्वर हे प्राचीन शंकराचे मंदिर आठव्या ते बाराव्या शतकात बांधले गेले असून, त्याभोवती दौलतमंगळ गड उभारण्यात आला.
Daulatmangal Fort
esakal
हे मंदिर पुणे-सोलापूर रस्त्यावर, पुण्यापासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर एका छोट्या टेकडीवर वसलेले आहे.
Daulatmangal Fort
esakal
या किल्ल्याला बुरूज आणि तटबंदी असून, छोटेखानी पण मजबूत अशा रचनेत तो बांधण्यात आला होता.
Daulatmangal Fort
esakal
१६२९ मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव येथे होता असा पहिला ऐतिहासिक उल्लेख आढळतो.
Daulatmangal Fort
esakal
आजही या किल्ल्याचे बुरूज, दरवाजा आणि वर जाणारी वाट चांगल्या स्थितीत पाहायला मिळते.
Daulatmangal Fort
esakal
आदिलशाहीने पुण्यावर हल्ला केल्यावर अनेक व्यापारी आणि प्रतिष्ठित मंडळी येथे आश्रयाला आली होती.
Daulatmangal Fort
esakal
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यात येण्यापूर्वी पुण्याचा कारभार काही वर्षे येथून चालवला जात होता.
Daulatmangal Fort
esakal
मंदिरात प्रवेशासाठी दोन्ही बाजूंनी जिने आहेत आणि प्रवेशद्वाराजवळ गणेश व विष्णू यांच्या प्रतिमा आहेत.
Daulatmangal Fort
esakal
मंदिरातील नंदी, कासव आणि कोरीव शिवपिंड यामुळे या वास्तूला अप्रतिम कलात्मकता लाभली आहे.
Daulatmangal Fort
esakal
मुस्लिम आक्रमकांनी अनेक मूर्ती मुद्दाम फोडल्याचे पुरावे मंदिरातील तुटलेल्या शिल्पांमधून दिसून येतात.
Daulatmangal Fort
esakal
प्रदक्षिणा मार्गावर गणेशी नावाची स्त्रीरूपातील गणेशाची प्रतिमा विशेष आकर्षण आहे.
Daulatmangal Fort
esakal
मंदिर आणि कड्याच्या भिंतीत छत नसल्याने येणारा नैसर्गिक प्रकाश कोरीव कामाला दिव्य सौंदर्य देतो.
Daulatmangal Fort
esakal
Shivaji Maharaj
esakal