Aarti Badade
पुण्यातील विठ्ठल भक्तांसाठी, सिंहगड रस्त्यावरील हे मंदिर म्हणजे छोटं पंढरपूरच आहे!
राजाराम पुलानंतर उजवीकडे एक कमान दिसते. हीच विठ्ठलवाडीची सुरुवात आहे.
एकदा शेतकरी संभाजी गोसावी यांच्या नांगराला काहीतरी अडकले. तिथे साक्षात विठ्ठल प्रकट झाले!
श्री विठ्ठल मूर्तीची काळजी घेण्यासाठी शाहू महाराजांनी जमीन इनाम दिली होती. त्याची नोंद आजही भिंतीवर कोरलेली आहे.
कागदपत्रानुसार, हे मंदिर १७३२ पूर्वीचे आहे. निजामाच्या हल्ल्यात त्याचे नुकसान झाले. नंतर पेशव्यांनी त्याची दुरुस्ती केली.
पेशवाई शैलीत हे मंदिर गढीसारखं बांधले. त्यात ओवऱ्या, तटबंदी आणि सभामंडप आहे. हे एक भव्य वास्तूशिल्प आहे!
येथे जयपूर शैलीचं आरसेकाम आहे. विठ्ठल मूर्तीच्या कपाळावर नांगर लागल्याची 'खाच' आहे. ही ऐतिहासिक खुण आहे!
मंदिरात बाराही महिने पाणी असलेली विहीर आहे. आजही गोसावी कुटुंब मंदिराची सेवा करत आहे.
मंदिरात दशावतार, महादेव, मारुती, गरुड आणि शनी यांच्या मूर्ती आहेत. हे भक्तीचा पूर्ण संगम दाखवते.
मावळी पगडीतील मूर्ती हेच मूळ विठ्ठल भक्त संभाजी गोसावी यांचे स्मारक आहे.