Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धेत पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला क्वालिफायर २ सामन्यात पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे.
पंजाब किंग्स यंदा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात, तर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंगच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे.
रिकी पाँटिंग हा क्रिकेटमधील एक उत्तम कर्णधार म्हणून ओळखला जातो, पण आता त्याने आयपीएलमधून तो एक प्रशिक्षक म्हणून यशस्वी ठरत असल्याचे दाखवून दिले आहे.
रिकी पाँटिंगने मुख्य प्रशिक्षक म्हणून आयपीएलमध्ये कोणालाच न जमलेला पराक्रम करून दाखवला आहे.
पाँटिंग पहिलाच असा प्रशिक्षक बनला आहे, ज्याने तीन वेगवेगळ्या संघांना त्याच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचवलं आहे.
पाँटिंगच्या मार्गदर्शनात २०१५ साली मुंबई इंडियन्सने विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्सला त्याच्या मार्गदर्शनात उपविजेतेपद मिळालं होत. आता पंजाबही अंतिम सामन्यात पोहचले आहे.
विशेष म्हणजे २०२० मध्ये जेव्हा दिल्ली कॅपिटल्स अंतिम सामन्यात पोहोचले होते, त्यावेळी श्रेयस अय्यरच दिल्ली संघाचा कर्णधार होता. या दोघांच्या जोडीने आता पंजाबलाही अंतिम सामन्यापर्यंत नेले आहे.