Aarti Badade
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात, सासवडजवळ वसलेले कोडीत येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर हे एक अत्यंत पवित्र आणि जागृत तीर्थस्थान मानले जाते.
Shrinath Mhaskoba Temple Kodit history
Sakal
पौराणिक कथेनुसार, श्रीनाथ म्हस्कोबा महाराज हे मूळचे 'वीर' (पुरंदर) गावचे आहेत. श्री तुळाजीबुवा बडधे यांच्या निस्सीम भक्तीमुळे महाराज कोडीत येथे आले, अशी मान्यता आहे.
Shrinath Mhaskoba Temple Kodit history
Sakal
कोडीत येथील मंदिरात श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांच्या मूर्ती 'स्वयंभू' आहेत. या जमिनीतून आपोआप प्रकट झाल्याचे मानले जाते.
Shrinath Mhaskoba Temple Kodit history
Sakal
श्रीनाथ म्हस्कोबा हे भगवान शंकराचे 'काळभैरव' रूप मानले जातात. संकटात भक्तांचे रक्षण करणारे आणि मनोकामना पूर्ण करणारे दैवत म्हणून त्यांची ख्याती आहे.
Shrinath Mhaskoba Temple Kodit history
Sakal
हे मंदिर पुरंदर किल्ल्याच्या डोंगररांगांमध्ये आणि निसर्गरम्य हिरवाईत वसलेले आहे. येथील वातावरण भक्तांना मानसिक शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करते.
Shrinath Mhaskoba Temple Kodit history
Sakal
मंदिराचा परिसर सुमारे दोन एकर असून दर अमावस्येला येथे भक्तांची अलोट गर्दी होते. या दिवशी विशेष महाप्रसाद (अन्नदान) आणि भंडाऱ्याचे आयोजन केले जाते.
Shrinath Mhaskoba Temple Kodit history
Sakal
कोडीतचा म्हस्कोबा हा वीरच्या म्हस्कोबाचाच अंश मानला जातो. तुळाजीबुवांच्या भक्तीमुळे पावन झालेल्या या भूमीला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात.
Shrinath Mhaskoba Temple Kodit history
Sakal
Sambhaji Maharaj in London Gazette
Sakal