Apurva Kulkarni
रत्नागिरीपासून 25 किमी अंतरावर मुचकुंदी नदीच्या मुखाशी पुर्णगड किल्ला उभारलेला आहे. पुर्णविराम आकाराचा लहानसा किल्ला असल्याने त्याला पुर्णगड असं नाव देण्यात आलय.
Purnagad Fort:
esakal
हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेल्या किल्लापैकी एक असून हा किल्ला बांधल्यानंतर अनेक किल्ल्यांचे काम थांबवल्यानं याला पुर्णगड असं नाव दिल्याचं बोललं जातं.
Purnagad Fort:
esakal
परंतु काही ऐतिहासिक कथेनुसार अठराव्या शतकात नानासाहेब पेशवे यांच्या काळात आनंदराव धुळप यांनी या किल्ल्याची बांधणी केली.
Purnagad Fort:
esakal
हा किल्ला आयताकृती असून पुर्व पश्चिम असा पसरलेला आहे. या किल्ल्याच्या तटबंदीत एकून सात बुरूज आहे.
Purnagad Fort:
esakal
मुचकुंदी नदीच्या खाडीपात्रातून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी पेशवेकाळात हा पुर्णगड टेहळणीचा किल्ला बांधण्यात आल्याचं बोललं जातं.
Purnagad Fort:
esakal
अतिशय दाट झाडीमध्ये समुद्र किनारी टेकडीवर उभा असलेला हा पुर्णगड निसर्ग सौदर्याने भरलेला आहे.
Purnagad Fort:
esakal
या पुर्णगड किल्ल्याजवळ कोणतीही राहण्याची खाण्याची सोय नाही. सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्य़ंत तुम्ही किल्ल्यावर जाऊ शकतात.
Purnagad Fort:
esakal
रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून 24 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. या किल्ला पाहण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
Purnagad Fort:
esakal