Monika Shinde
कुतुब मिनार ही दिल्लीतील प्रसिद्ध ऐतिहासिक इमारत आहे. ती १२३० मध्ये बांधली गेली. परंतु अनेकांना कुतुब मिनारच्या आत काय आहे, हे माहित नाही.
कुतुब मिनारमध्ये ३७९ पायऱ्या आहेत, ज्यातून वरच्या मजल्यापर्यंत जाता येते. भिंतींवर संस्कृत व अरबी भाषा आणि कोरीव नक्षीकरणे आहेत.
मिनारच्या आत एक संकरी वळणदार जिना आहे. ती पायऱ्या अत्यंत अरुंद आणि उंच आहेत, त्यामुळे चढणं कठीण असते.
आधी पर्यटकांना आत जाण्यास परवानगी होती. पण ४ डिसेंबर १९८१ रोजी एका अपघातानंतर सुरक्षा कारणांमुळे बंदी घालण्यात आली.
अपघातात एक मुलगा पायऱ्यांवरून खाली कोसळला होता. त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेसाठी पुढील प्रवेश बंद केला गेला.
कुतुब मिनारच्या देखभालीसाठी आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया जबाबदार आहे. तेथे वेळोवेळी देखरेख केली जाते.
आज कुतुब मिनार फक्त बाहेरून पाहण्यापुरतीच मर्यादित आहे. आत जाण्यास बंदी असून, फक्त अधिकाऱ्यांना किंवा कामगारांना प्रवेश मिळतो.
ही बंदी सुरक्षेसाठी आहे. पण कुतुब मिनारच्या भव्यतेचा आनंद घेत बाहेरूनही पर्यटकांच्या मनावर अविस्मरणीय छाप पडते