Anuradha Vipat
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे.
५ डिसेंबरला संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित झाला.
हा चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना ‘पुष्पाराज’ पाहायला मिळाला होता.
आता जगभरात या चित्रपटाने १ हजार ३२२ कोटी कमावले आहेत.
आता या चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडला छप्परफाड कमाई केल्याचं पाहायला मिळालं आहे
वृत्तानुसार, ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटाने ११ व्या दिवशी म्हणजे रिलीजनंतर दुसऱ्या रविवारी तब्बल ७५ कोटींची कमाई केली आहे.
आता भविष्यात ‘पुष्पा २’ सिनेमा बाहुबलीचा रेकॉर्ड मोडणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.