Mayur Ratnaparkhe
पुतीन यांची ही कार VR10-स्तरीय बुलेटप्रुफ संरक्षण प्रदान करते. आर्मर-पियर्सिंग गोळीबार अन् हॅण्ड ग्रेनेड हल्ला देखील रोखू शकते.
कारच्या खिडकीच्या काचा बुलेटप्रूफ आहेत आणि अंदाजे 6 सेंटीमीटर जाड आहेत.
कारची अंडरबॉडी स्फोटप्रूफ आहे, म्हणजेच बॉम्ब स्फोटापासूनही प्रवाशांचे संरक्षण होते.
केबिनमध्ये एक विशेष एअर फिल्टर आणि अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा प्रणाली आहे, ज्यामुळे विषारी वायू किंवा रासायनिक हल्ल्यातही श्वास घेण्यास त्रास होत नाही.
गोळ्या लागल्या किंवा पंक्चर झाले तरीही कारचे टायर्स सुरक्षित राहतात. अशास्थितीतही कार दूरपर्यंत उच्च वेगाने प्रवास करू शकते.
आतील आणि बाहेरील चर्चा पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय राहता. कोणीही त्यांना हॅक करू शकत नाही.
जर दरवाजे उघडले नाहीत तर मागील खिडकी उघडते, ज्यामुळे लगेच बाहेर पडता येते.
इंजिनमध्ये किंवा कारखाली आग लागल्यास, कारची विशेष यंत्रणा स्वयंचलितपणे आग शोधते आणि विझवते.
ही कार सर्व आवश्यक नियंत्रण आणि संप्रेषण वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेले मोबाईल कमांड सेंटर म्हणून काम करते.
esakal