सकाळ डिजिटल टीम
भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू रविवारी, २२ डिसेंबर २०२४ रोजी लग्न बंधनात अडकली.
उद्योगपती वेंकट दत्त साई यांच्यासोबत तिने लग्न केले.
राजस्थानमधील उदयपूरमध्ये तिचा विवाहसोहळा पार पडला.
विवाहसोहळ्यासाठी अनेक मोठ्या मान्यवरांसह त्यांचे कुटुंबिय आणि मित्रपरिवार उपस्थित होते.
जोधपूरमधील सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे देखील त्यांच्या लग्नासाठी उपस्थित होते.
तिचा नवरा Posidex Technologies या कंपनीत कार्यकारी संचालक म्हणून काम करतो.
हैद्राबादमध्ये तिचा साखरपुडा पार पडला.
रिसेप्शन २४ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये होणार आहे.