Varsha Balhe
अजगर हा जगातील मोठ्या सापांपैकी एक आहे. तो बिनविषारी असून आपल्या भक्ष्याला शरीराभोवती वेटोळे घालून पकडतो.
PYTHON VS ANACONDA
esakal
ही बिनविषारी साप आहे. तो जगातील सर्वात जड साप मानला जातो. त्याचे शरीर अजगरापेक्षा अधिक जाड आणि मजबूत असते.
PYTHON VS ANACONDA
esakal
अजगर प्रामुख्याने आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात आढळतात. तर अॅनाकोंडा दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन आणि ओरिनोको नदीच्या खोऱ्यात राहतात.
PYTHON VS ANACONDA
esakal
रेटिक्युलेटेड अजगर १० मीटरपर्यंत लांब वाढू शकतो. तर ग्रीन अॅनाकोंडा लांबीने काहीसा कमी असला, तरी वजनाने आणि शरीराच्या जाडीने अधिक मोठा असतो.
PYTHON VS ANACONDA
esakal
मादी अजगर अंडी घालते आणि त्यांना उब देण्यासाठी अंड्यांभोवती वेटोळे घालते. याउलट, मादी अॅनाकोंडा थेट पिल्लांना जन्म देते.
PYTHON VS ANACONDA
esakal
अजगर जमिनीवर, झाडांवर आणि पाण्यातही वावरू शकतात. मात्र, अॅनाकोंडाला पाण्यात राहणे अधिक आवडते. तो बराच वेळ पाण्यात घालवतो.
PYTHON VS ANACONDA
esakal
अजगर आणि अॅनाकोंडा दोघेही भक्ष्याला शरीराभोवती वेटोळे घालून पकडतात. त्यानंतर भक्ष्याला संपूर्ण गिळतात. दोघेही विषाचा वापर करत नाहीत.
PYTHON VS ANACONDA
esakal
अजगराची ओळख त्याच्या लांबीमुळे आहे, तर अॅनाकोंडा त्याच्या वजन आणि जाड शरीरामुळे ओळखला जातो. दोघेही मोठे असले, तरी त्यांच्या राहण्याच्या जागा आणि प्रजनन पद्धती वेगवेगळ्या आहेत.
PYTHON VS ANACONDA
esakal
BENEFITS OF DRINKING WATER IN THE MORNING
esakal