'या' लंगड्या राणीने गझनीला दोनदा पळवून लावलं, दिद्दाचा थरारक इतिहास माहित्येय?

Yashwant Kshirsagar

महिला वीरगाथेची दुसरी कहाणी

जेव्हा महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येतो, तेव्हा राणी लक्ष्मीबाईंचे नाव घेतले जाते. पण त्यात आणखी एक नाव जोडायला हवे – काश्मीरची राणी दिद्दा. जिला ‘चेटकीण राणी’ म्हणत, पण ज्याने भल्याभल्यांना वाकवले.

Kashmir Queen Didda

|

esakal

जन्म आणि त्याग

लोहार राजवंशात (आजचा हरियाणा, पंजाब, पुंज, राजौरी भाग) जन्मलेली दिद्दा दिव्यांग होती. आई-वडिलांनी तिला सोडून दिले. एका दासीने तिला सांभाळून मोठे केले. दिव्यांगत्वाचे ओझे न बाळगता तिने सर्व युद्धकौशल्ये आत्मसात केली.

Kashmir Queen Didda

|

esakal

प्रेमाची अनोखी कहाणी

शिकारीवर निघालेल्या काश्मीरच्या क्षेमगुप्ताची नजर दिद्दावर पडली. ती लंगडी आहे हे माहित असूनही तो तिच्या प्रेमात पडला आणि लग्न केले. त्याने तिच्या नावाचे नाणेही काढले आणि स्वतःच्या नावापुढे ‘दिद्द-क्षेमगुप्त’ असे लिहिले.

Kashmir Queen Didda

|

esakal

सत्तेची खेळी

नवऱ्याच्या मृत्यूनंतर शत्रूंनी तिला सती घालवण्याचा कट रचला. दिद्दाने मात्र क्षेमगुप्ताच्या पहिल्या पत्नीलाच सती घालवले आणि स्वबळावर काश्मीरची गादी मिळवली. जवळपास ५० वर्षे तिने राज्य केले.

Kashmir Queen Didda

|

esakal

तीक्ष्ण बुद्धीची राणी

दिद्दा इतकी हुशार होती की आजवर भारतानेच काय, जगानेही अशी राणी क्वचितच पाहिली असेल. तिच्या रणनीतीमुळेच तिला ‘चेटकीण राणी’चा खिताब मिळाला.

Kashmir Queen Didda

|

esakal

गनिमी काव्याचा शोध

आज आपण जो ‘गनिमी कावा’ ऐकतो, त्याचा शोध या लंगड्या राणीनेच लावला असे म्हणतात. काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यांचा वापर करून तिने युद्धाची नवी टेक्निक शोधली.

Kashmir Queen Didda

|

esakal

३५,००० विरुद्ध ५००

महंमद गझनी ३५,००० सैन्यासह काश्मीर मार्गे भारतात घुसण्यासाठी आला. दिद्दाने अवघ्या ५०० सैनिकांसह त्याचा धुव्वा उडवला – आणि तेही फक्त ४५ मिनिटांत!

Kashmir Queen Didda

|

esakal

गझनीचा पहिला डाव फसला

दिद्दाच्या गनिमी काव्याने गझनीचे सैन्य सैरावैरा पळाले. काश्मीर मार्गे भारतावर आक्रमण करण्याचा त्याचा पहिला प्रयत्न पूर्ण फसला.

Kashmir Queen Didda

|

esakal

दुसऱ्यांदाही पराभव

गझनीने पुन्हा पूर्ण तयारीने काश्मीरवर हल्ला केला. पण दिद्दाने पुन्हा पराभव केला. शेवटी कंटाळून त्याने काश्मीर मार्ग सोडला आणि गुजरात मार्गे भारतावर आक्रमण केले.

Kashmir Queen Didda

|

esakal

अजिंक्य महानायिका

दिद्दा ही केवळ राणी नव्हती, तर सर्वांची महानायिका होती. महंमद गझनीसारखा सुलतानही तिच्यापुढे नतमस्तक झाला. पराभव करता न आल्याने शत्रूंनी तिला ‘चेटकीण’ म्हटले, पण इतिहास तिला अजिंक्य वीरांगना म्हणून ओळखतो.

Kashmir Queen Didda

|

esakal

रात्री झोपी जाण्यापूर्वी आरशात पाहावे की नाही? वास्तुशास्त्र काय सांगते?

Mirror Vastu Tips

|

esakal

येथे क्लिक करा