Puja Bonkile
सकाळी नाश्त्यात झठपट काही बनवायचे असेल तर ओट्स ऑमलेट तयार करू शकता.
हा नाश्ता तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवेल.
यासाठी रवा,बेसन,ओवा,जिरं, हळद, टोमॅटो, गाजर, कांदा,दही, मीठ, पाणी, तेल हे साहित्य लागेल.
सर्वात आधी एका भाड्यांत ओट्स, रवा, जिरं, हळद आणि मीठ टाकून चांगले मिसळा.
नंतर त्यात टोमॅटो,गाजर,कांदा मिसळा. नंतर दही आणि पाणी मिसळा.
नंतर गरम तव्यावर टाका. आणि ऑमलेट तयार करा.
तुम्ही मुलांना टिफिनमध्ये किंवा ऑफिसला जातांना हा पदार्थ तयार करू शकता.