सकाळ डिजिटल टीम
शेंगदाणे खायला सर्वांनाच आवडते.
जवळपास सर्वच बाजारातुन विकत शेंगदाणे आणून आवडीने खातात.
कमी वेळेत आणी कमी खर्चात तुम्ही हे शेंगदाणे घरचे घरी तयार करू शकतात.
खारे शेंगदाणे बनवण्यासाठी १ किलो शेंगदाणे, गरजेनुसार पाणी आणि चविनुसार मिठ
सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते पाणी व्यवस्थित उकळवून घ्या.
पाणी उकळल्यानंतर त्यात शेंगदाणे घालावेत.
शेंगदाणे व्यवस्थित ५ ते १० मिनिटे उकळवून घेतल्यानंतर ते एका वेगळ्या भांड्यात काढून घ्या.
एका कढईत कपभर मीठ घेऊन त्यात हे शेंगदाणे ओतून हलकेच परतून घ्यावे. मग चाळणीने चाळून जास्तीचे मीठ काढून घ्यावे.
खारे शेंगदाणे एका हवाबंद डब्यांत भरुन तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात.