Aarti Badade
कुरकुरीत, चवदार आणि पोटभरीचा उपवासाचा पदार्थ
१ वाटी भिजवलेला साबुदाणा,१ बटाटा (उकडून कुस्करलेला),२-३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या),½ वाटी शेंगदाण्याचे कूट,१ टीस्पून साखर,मीठ चवीनुसार,½ वाटी तेल (आप्पे भाजण्यासाठी)
साबुदाणा आदल्या रात्री पाण्यात भिजत घालावा. सकाळी तो मोकळा आणि फुललेला असावा.
एका मोठ्या भांड्यात भिजवलेला साबुदाणा, उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, शेंगदाणा कूट, साखर आणि मीठ घेऊन सर्व साहित्य एकजीव करून घ्या.
आप्पे पात्र किंवा तवा मध्यम आचेवर गरम करून, प्रत्येक कप्प्यात थोडे थोडे तेल घालावे.
तयार केलेल्या सारणाचे छोटे गोळे करून, प्रत्येक तेलाच्या कप्प्यात एक-एक गोळा ठेवावा.
Content: आप्पे दोन्ही बाजूंनी छान खरपूस आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
आप्पे कच्चे राहिल्यास त्यांची चव बिघडते, म्हणून ते पूर्णपणे खरपूस भाजले असल्याची खात्री करून घ्या.
साबुदाण्याचे आप्पे दही, चटणी किंवा सांडग्या मिरचीसोबत गरमगरम सर्व्ह करा.
Content: थोड्या साहित्यात आणि कमी वेळात तयार होणारा हा खास उपवासाचा पदार्थ – आजच करून पाहा!