वीकेंड स्पेशल! घरीच बनवा क्रीमी चिकन टिक्का मसाला

Aarti Badade

आवश्यक घटक

२ चिकन ब्रेस्ट, तंदुरी पेस्ट, दही, सिंगल क्रीम, टोमॅटो प्युरी, आले-लसूण, तमालपत्र आणि भारतीय खडे मसाले.

 Chicken Tikka Masala

|

sakal

मॅरिनेशनची पहिली पायरी

एका बाऊलमध्ये २ चमचे तंदुरी मसाला आणि २ चमचे दही एकत्र करून चांगले फेटून घ्या.

 Chicken Tikka Masala

|

Sakal

चिकनला मुरू द्या

दह्याच्या मिश्रणात चिकनचे तुकडे घालून ते २ तास फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे चिकन आतून मऊ आणि चविष्ट होते.

 Chicken Tikka Masala

|

Sakal

चिकन बेक करा

ओव्हन १८०°C वर गरम करून मॅरिनेट केलेले चिकन १० मिनिटे बेक करून घ्या. (ओव्हन नसल्यास तव्यावरही शिजवू शकता).

 Chicken Tikka Masala

|

Sakal

वाटण तयार करा

२०० ग्रॅम टोमॅटो, आले, लसूण आणि ३ चमचे मलई (क्रीम) एकत्र करून मिक्सरला बारीक वाटून घ्या.

 Chicken Tikka Masala

|

Sakal

फोडणीची तयारी

कढईत ऑईल गरम करून त्यात तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगावर परतून घ्या.

 Chicken Tikka Masala

|

Sakal

मसाले आणि चिकन

परतलेल्या कांद्यात लाल मिरची, हळद, जिरे, कोथिंबीर आणि गरम मसाला, चिकन मसाला घाला, आता त्यात भाजलेले चिकनचे तुकडे टाकून परता.

 Chicken Tikka Masala

|

Sakal

ग्रेव्ही तयार करा

तयार टोमॅटो-क्रीमचे मिश्रण कढईत ओता आणि मंद आचेवर ५-७ मिनिटे शिजू द्या. तेल सुटेपर्यंत परता. नंतर गरज असल्यास थोडे पाणी घालून ग्रेव्ही घट्ट ठेवा.

 Chicken Tikka Masala

|

Sakal

गरमागरम सर्व्ह करा

ग्रेव्हीला छान लाल रंग आला की वरून कोथिंबीर टाका. तयार आहे हॉटेल स्टाईल चिकन टिक्का मसाला!

 Chicken Tikka Masala

|

Sakal

एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! असा बनवा झटपट सुपरटेस्टी चिकन पराठा!

Chicken Paratha recipe

|

Sakal

येथे क्लिक करा