Aarti Badade
ब्रेड स्लाईस, टोमॅटो सॉस, कांदा, टोमॅटो, चीज आणि तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरा.
ब्रेडवर टोमॅटो सॉस लावा. हवे असल्यास त्यात टोमॅटो प्युरी, चिली फ्लेक्स, काळी मिरी, लसूण, साखर आणि हर्ब्स घालू शकता.
चिरलेला कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, ब्लॅक ऑलिव्ह्ज यांसारख्या आवडत्या भाज्या टाका.
मोझरेला चीज किंवा इतर कोणतेही चीज किसून सर्व भाज्यांवर शिंपडा.
तवा गरम करून मध्यम आचेवर ब्रेड पिझ्झा बेक करा. दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत बेक करा.
तयार झालेला ब्रेड पिझ्झा गरमागरम सॉस किंवा केचपसोबत सर्व्ह करा.
साहित्यात वेगवेगळे प्रयोग करा. मशरूम, पालेभाजी, इटालियन हर्ब्स वापरून पिझ्झा आणखी चवदार बनवा!