अश्विनसारखा खेळाडू भारताला मिळणार का?

Pranali Kodre

प्रॉब्लेम सॉल्वर

रविचंद्रन अश्विन... फक्त भारताचा महान ऑफस्पिनर नाही, तर क्रिकेटमधली प्रत्येक अडचण सोडवणारा प्रॉब्लेम सॉल्वर आहे.

R Ashwin

|

Sakal

स्वत:ला दिलेलं वचन

२०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका गमावल्यानंतर या पठ्ठ्याने स्वतःला एक वचन दिलं होतं 'यापुढे भारताला मायदेशात कधीही हारू द्यायचं नाही!'

R Ashwin

|

Sakal

मायदेशात सलग १८ मालिका

अन् त्यानंतर पुढची ११ वर्षे भारताने मायभूमीत तब्बल १८ मालिका जिंकल्या अन् त्यात अश्वीनचं योगदान महत्त्वाचं राहिलं. भारताच्या मायदेशातील वर्चस्वाचा अश्विन सर्वात मोठा शिल्पकार होता.

R Ashwin

|

Sakal

१०६ कसोटी...

१०६ कसोटींमध्ये ५३७ विकेट्स, ३७ फाईव्ह विकेट्स हॉल, ११ मालिकावीर पुरस्कार आणि ६ शतकांसह ३५०३ धावा त्याने केल्या.

ऑफ स्पिनर

पण अश्विन फक्त आकडेवारीपुरता मर्यादित कधीच नव्हता. जेव्हा जग म्हणायचं ऑफस्पिन म्हणजे एकच बॉल हजारदा टाकणं, तेव्हा या पठ्ठ्याने नवनवीन प्रयोग केले, कधी रन-अप बदलला, तर कधी कॅरम बॉल अन् दुसराचे variations शोधले आणि ऑफ स्पिनला नव्या शिखरावर पोहोचवलं.

R Ashwin

|

Sakal

समस्येवर मार्ग

दुखापत असो, संघातून वगळलं जाणं असो किंवा भाषेची अडचण असो, प्रत्येक समस्येवर त्याने मार्ग शोधला.

R Ashwin

|

Sakal

सर्व मायदेशातील सामने खेळले

आपल्या कारकिर्दीत त्याने एकही मायदेशातील कसोटी सामना पदार्पणापासून निवृत्तीपर्यंत मिस केला नाही, ही त्याच्या शिस्तीची आणि क्रिकेटवरील निष्ठेची आणखी एक मोठी खूण आहे.

R Ashwin

|

Sakal

१३ वर्षे

अश्विनने भारतासाठी १३ वर्षं दिली. अनेकदा संकटातून संघाला बाहेर काढलं आणि प्रत्येक टप्प्यावर स्वतःला बदलत राहिला. म्हणूनच अश्विनसारखा खेळाडू भारताला पुन्हा मिळणं सोपं नाही.

R Ashwin

|

Sakal

प्रयोग करणारा खेळाडू

अश्विन फक्त विकेट घेणारा गोलंदाज नव्हता, तो सतत शिकणारा, प्रयोग करणारा, समस्या सोडवणारा आणि संघासाठी शेवटपर्यंत झगडणारा क्रिकेटर होता.

R Ashwin

|

Sakal

इंजिनियर असलेले ७ भारतीय क्रिकेटपटू

Cricketers With Engineering Degrees

|

Sakal

येथे क्लिक करा