Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा नुकतीच ३ जून रोजी संपली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने या हंगामाचे विजेतेपद पटकावले.
यंदाच्या हंगामातही विविध संघातील खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे.
याचदरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना आयपीएल २०२५ मधील सर्वोत्तम १२ जणांच्या संघाची निवड केली आहे.
मात्र अश्विनने बंगळुरूचा दिग्गज विराट कोहलीची मात्र या संघात निवड केलेली नाही, त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे.
विराटने आयपीएल २०२५ मध्ये १५ सामन्यांत ६५७ धावा केल्या. त्याने ८ अर्धशतके केली आहे. पण यानंतरही अश्विनने त्याची निवड न केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
अश्विनने त्याच्या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला केले आहे.
साई सुदर्शन, फिल सॉल्ट, श्रेयस अय्यर (कर्णधार),सूर्यकुमार यादव, निकोलस पूरन, शशांक सिंह, जितेश शर्मा, कृणाल पांड्या, कुलदीप यादव/नूर अहमद, जोश हेजलवूड, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.