Sandeep Shirguppe
राधानगरी धरण हे भारतातील पहिले स्वयंचलित दरवाजे असलेले धरण आहे. कोल्हापूरच्या शाहू महाराज यांनी हे धरण बांधले.
राधानगरी धरणाला एकूण सात स्वयंचलित दरवाजे असून प्रत्येकातून १४७० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतो.
१९०९ मध्ये धरणाचे बांधकाम सुरू झाले आणि १९१८ पर्यंत ४० फुटांपर्यंत पूर्ण झाले, असे एका लेखात नमूद आहे.
याची रचना अशी आहे की पावसाळ्यात पाण्याची पातळी ठराविक उंचीला पोहोचली की दरवाजे आपोआप उघडतात.
पाण्याची पातळी कमी झाली की ते पुन्हा आपोआप बंद होतात, कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय!
ही संपूर्ण प्रक्रिया हायड्रो-मेकेनिकल डिझाइनवर आधारित आहे, ज्यामुळे धरण नेहमी सुरक्षित राहते.
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांनी तयार केले आहेत.
पावसाळ्यात राधानगरीच्या परिसरात आला असाल तर धरणाचे हे दृश्य नक्की अनुभवून पाहा.
राधानगरी धरण म्हणजे कोल्हापूरच्या हिरव्यागार शेतीचे गमक आहे. याचे सर्व श्रेय छत्रपती शाहू महाराज यांना जाते.