सकाळ डिजिटल टीम
महिलांच्या बुद्धीबळ विश्वकरंडकाचं अजिंक्यपद भारताकडेच राहणार हे निश्चित झालंय. अंतिम फेरीत कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात लढत होत आहे.
युवा ग्रँडमास्टर 19 वर्षीय दिव्या देशमुख भारतीय बुद्धीबळातली उदयोन्मुख प्रतिभावंत खेळाडू आहे. तिचा सामना अनुभव कोनेरू हंपीसोबत होणार आहे.
नागपूरची असलेली दिव्या वयाच्या ५ व्या वर्षांपासून बुद्धीबळाचे धडे गिरवत आहे. तिचे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत.
दिव्याची बहीण बॅडमिंटन खेळत होती, त्यातूनच तिची खेळात आवड निर्माण झाली. पण दिव्याचा कल बॅडमिंटनऐवजी बुद्धीबळाकडे जास्त होता.
वयाच्या पाचव्या वर्षी दिव्यानं अंडर ७ चॅम्पियनशिप जिंकली होती. त्यानंतर तिने डरबनमध्ये अंडर १० स्पर्धाही जिंकली.
दिव्या देशमुखने २०१७मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या अंडर १२ स्पर्धेत भाग घेतला होता. यातही तिने विजेतेपद पटकावलं. तर २०२३ मध्ये इंटरनॅशनल मास्टर बनली.
२०२४ च्या वर्ल्ड ज्युनिअर गर्ल्स अंडर २० स्पर्धेचं दिव्यानं विजेतेपद पटकावलं. त्यानंतर हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये ४५व्या चेस ऑलिम्पियाड विजेत्या भारतीय संघातही ती होती.
दिव्याच्या नावावर आतापर्यंत तीन ऑलिम्पियाड गोल्ड, अनेक एशियन आणि वर्ल्ड युथ विजेतेपदं पटकावली आहेत.