Mayur Ratnaparkhe
गुगलमध्ये नोकरी मिळवणे हे अनेकांसाठी स्वप्न असते. गुरुग्रामच्या रागिनी दासने हे स्वप्न साकार केले आहे.
२०१३ मध्ये याच गुगल कंपनीने रागिनीला नाकारले होते. मात्र, आज त्याच कंपनीने तिला “स्टार्टअप प्रमुख” म्हणून नियुक्त केले आहे.
रागिनी दासने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, तिच्या प्रवासाची प्रेरणादायी कथा सांगितली आहे.
रागिनी दासने चेन्नईतील चेट्टीनाड विद्याश्रम येथे शालेय शिक्षण घेतले.
यानंतर रागिनीने लँकेस्टर विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनात पदवी मिळवली.
रागिनीने स्टँडर्ड चार्टर्ड बँकसह विविध संस्थांमध्ये काम केले आहे. ती FICCI स्टार्टअप महिला समितीची अध्यक्षा राहिली आहे.
२०१३ मध्ये रागिनी झोमॅटोमध्ये सेल्स आणि मार्केटिंग मॅनेजर म्हणून रुजू झाली. सहा वर्षांत ती एरिया सेल्स मॅनेजर पदावर पोहोचली.
२०२० मध्ये रागिनीने leap.club ची स्थापना केली. या प्लॅटफॉर्मद्वारे तिने हजारो महिलांना स्टार्टअप उभारण्यासाठी मदत केली..
first camera mobile phone
ESakal