Shubham Banubakode
रायगडावर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या उत्खननात एक खगोलशास्त्रीय उपकरण सापडले सापडले आहे. ‘यंत्रराज’ सौम्ययंत्र (Astrolabe), असं त्याचं नाव आहे.
‘यंत्रराज’ सौम्ययंत्र हे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण आहे. ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास, दिशांचा वेध आणि वेळ मोजण्यासाठी याचा उपयोग होत असे.
गेल्या 3-4 वर्षांपासून रायगडावर उत्खनन सुरू आहे. कुशावर्त तलाव, वाडेश्वर मंदिर आणि बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर परिसरात 10-12 ठिकाणी हे कार्य पूर्ण झाले.
कुशावर्त तलावाच्या वरच्या भागात आणि पर्जन्यमापक ते वाडेश्वर मंदिर परिसरात उत्खननादरम्यान हे सौम्ययंत्र सापडले. शिवकालीन वाड्यांच्या अवशेषांमधून हा ठेवा उजेडात आला.
यंत्रावर कासव/साप सदृश्य प्राण्यांचे अंकन आहे. ‘मुख’ आणि ‘पूंछ’ अशी कोरीव अक्षरे उत्तर-दक्षिण दिशा दर्शवतात. ही रचना खगोलशास्त्रीय गणनांसाठी उपयुक्त होती.
रायगडाच्या बांधकामात खगोलशास्त्रीय अभ्यासाचा उपयोग झाला. अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त यांचा अभ्यास करून गडाची रचना अत्याधुनिक पद्धतीने झाली होती.
या यंत्रामुळे शिवकालीन खगोलशास्त्र आणि स्थापत्यशास्त्राचा अभ्यास सखोल होणार आहे. इतिहास संशोधकांना यामुळे नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा हा आणखी एक पुरावा आहे. रायगडावरील हा शोध मराठ्यांच्या वैज्ञानिक प्रगतीचे दर्शन घडवतो.