Sandip Kapde
रायगड जिल्ह्यात निसर्गाच्या कुशीत फुलपाखरांची एक सुंदर आणि रंगीबेरंगी दुनिया फुलली आहे.
रायगड जिल्ह्यात तब्बल १४७ प्रजातींच्या फुलपाखरांचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू असलेले ब्ल्यू मॉरमॉन अर्थात राणी पाकोळी हे या जैवविविधतेचे खास आकर्षण आहे.
पश्चिम घाटातील सर्वात मोठे दुर्मिळ फुलपाखरू म्हणून ओळखले जाणारे सदर्न बर्ड विंगही रायगडात आढळते.
पश्चिम घाट, हिरवीगार झाडेझुडपे, समुद्रकिनारे आणि कांदळवने यांमुळे फुलपाखरांना पोषक अधिवास मिळतो.
गुलाबी राणी, पितांबरी, सांजपरी, हळदीकुंकू आणि मयूर भिरभिरी अशा विविध नावांची फुलपाखरे या दुनियेचे सौंदर्य वाढवतात.
कडुनिंब, कढीपत्ता, लिंबू, सीताफळ आणि कदंब यांसारख्या झाडांवर अनेक फुलपाखरे अंडी घालतात.
तिनविरा धरणाजवळ उभारण्यात आलेले खासगी फुलपाखरू उद्यान निसर्गप्रेमींसाठी आकर्षण ठरत आहे.
फुलपाखरे परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि पर्यावरणातील जैवविविधता टिकवण्यास मदत करतात.
तणनाशकांचा वाढता वापर, औद्योगिकीकरण आणि प्रदूषण यांमुळे फुलपाखरांचा अधिवास धोक्यात येत आहे.
रायगडातील या रंगीबेरंगी निसर्गसंपदेचे सौंदर्य पुढील पिढ्यांनाही अनुभवता यावे, यासाठी फुलपाखरे आणि त्यांच्या अधिवासाचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
India shines brightly at night from space, revealing glowing cities, coastlines, and networks of lights.
esakal