Sandeep Shirguppe
रायगडसह राज्यभरात ३५१ वा शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी २२ मंडप, १०९ सीसीटीव्ही कॅमेरे, १५ वैद्यकीय कक्षांची सुविधा आहे.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिमाखदार सोहळा संपन्न होत आहे.
शककर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्णमूर्तीवर अभिषेक करण्यात येणार आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर येत आहेत.
राज्यभरातून शिवभक्त येत असल्याने राज्य परिवहनच्या १०० बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
३५१ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त कोल्हापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
नवीन राजवाड्याच्या प्रांगणातील दिमाखदार कार्यक्रम, अ. भा. मराठा महासंघाची भव्य मिरवणूक, शिवाजी पेठेतही कार्यक्रम होणार आहेत.