Aarti Badade
निसर्गसंपन्न रायगड हा केवळ ऐतिहासिक नाही, तर जैवविविधतेनेही परिपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड का केली, याचे उत्तर येथे मिळते.
रायगड परिसरात सुमारे ३५ प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात. या वनस्पतींचा वापर अनेक रोगांवरील उपचारासाठी होतो.
शिवकालात रायगडाचा परिसर दुर्मिळ वनौषधींनी समृद्ध होता. आजही त्याचे अंश आपल्याला आढळतात.
टकमक टोकाच्या पायथ्याशी असलेली टकमकीवाडी ही औषधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे.
यकृतासाठी गुणकारी असलेला भुईआवळा या भागात नैसर्गिकरीत्या आढळतो.
वात व वेदनांवर उपयुक्त असलेला पांगारा झाड मोठ्या प्रमाणात दिसतो.
रिठा – नैसर्गिक साबण, हरडा – पचन सुधारते, त्रिफळामध्ये वापर होतो.
हे वनस्पती सर्दी, खोकला, दमा यावर गुणकारी आहेत. नष्ट होत चाललेली संपत्ती कालाच्या ओघात ही जैविक संपत्ती नष्ट होऊ लागली आहे. जागरूकतेने संरक्षणाची गरज आहे.