रायगडच्या कुशीत दडलेली रहस्यमय गुहा, जिथून दिसतं टकमक टोक; पायथ्यापासून ५ मिनिटांवर

Shubham Banubakode

निसर्गनिर्मित गुहा

रायगडाच्या पश्चिमेकडील डोंगरात एक अद्भुत निसर्गनिर्मित गुहा आहे. त्याला वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा असं म्हणतात.

Mysterious Waghbil Cave in Raigad

|

esakal

अनोखी गुहा

या गुहेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिला तब्बल तीन तोंडे आहेत. दोन पाचाडकडे, तर एक रायगडवाडीकडे उघडतं.

Mysterious Waghbil Cave in Raigad

|

esakal

जगात फक्त दोनच गुहा

अशी रचना असलेल्या गुहा जगात फक्त दोनच आहेत. एक युरोपातील “गन्स ऑफ नेव्हरॉन” आणि दुसरी रायगडातील वाघबीळ

Mysterious Waghbil Cave in Raigad

|

esakal

टेहळणी चौकी?

या गुहेतून एकाचवेळी पाचाडकोट आणि रायगड परिसरावर नजर ठेवता येते. म्हणूनच ही जागा टेहळणीसाठी वापरली जात असावी, असा अंदाज आहे.

Mysterious Waghbil Cave in Raigad

|

esakal

रायगडाचा नजारा

रायगडवाडीकडील अर्धवर्तुळाकार गुहेतून दिसतो रायदुर्गाचा नजारा दिसतो. इथूनच टकमक टोकही दिसते.

Mysterious Waghbil Cave in Raigad

|

esakal

विहंगम दृश्य

इथूनच कोकणदिवा, कावल्या-बावल्या खिंड आणि धबधब्यांचं विहंगम दृश्यही पाहायला मिळतं.

Mysterious Waghbil Cave in Raigad

|

esakal

नावामागचं कारण

‘नाचण’ म्हणजे नाचणी आणि ‘टेप’ म्हणजे छोटी टेकडी. स्थानिकांच्या मते, येथे नाचणी साठवली जात असल्यामुळे हे नाव पडले.

Mysterious Waghbil Cave in Raigad

|

esakal

वाघबीळ नाव कसं पडलं?

पाचाडकोटातून पाहिल्यावर गुहेची दोन तोंडे वाघाच्या डोळ्यांसारखी दिसतात. म्हणूनच या गुहेला वाघबीळ असं नाव पडलं.

Mysterious Waghbil Cave in Raigad

|

esakal

गन्स ऑफ पाचाड

युरोपातील “गन्स ऑफ नेव्हरॉन” गुहेसारखीच रचना असल्यामुळे या गुहेला 'गन्स ऑफ पाचाड' असंही म्हणतात.

Mysterious Waghbil Cave in Raigad

|

esakal

इथे आजही जपून ठेवला आहे शिवरायांच्या पुजा घरातील 'बाण', इंदिरा गांधींनीही घेतलं होतं दर्शन

shivaji maharaj shivling | esakal
हेही वाचा -