Shubham Banubakode
छत्रपती शिवाजी महाराज हे शिवभक्त होते. त्यांच्या पुजाघरात एक बाण अर्थात शिवलिंग होते.
शिवाजी महाराज दररोज सकाळी या शिवलिंगाची पुजा करायचे.
आज साडेतिनशे वर्षांनंतरही हा बाण त्यांच्या वंशजांनी जपून ठेवला आहे. चंद्रशेखर असं या बाणाचं नाव आहे.
विशेष म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही या बाणाचं दर्शन घेतलंय.
शिवाजी महाराज स्वारी किंवा शिकारीला जाताना हा बाण जवळ बाळगत असत. औरंगजेबाच्या भेटीदरम्यानही हा बाण त्यांच्या बरोबर होता.
शिवाजी महाराज जेव्हा औरंगजेबाच्या कैदेतून सुटले, तेव्हा मदारी मेहतर फरासा यांनी हा बाण रायगडावर पोहोचवला.
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर इतिकाद खानाचा वेढा रायगडाला पडला तेव्हा सर्व सामान बाहेर काढण्यात आलं. यात या बाणाचाही समावेश होता.
पुढे राजाराम महाराजांनी या बाणाची पुजा केली. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर अनेक वर्ष हा बाण सिंहगडावरील त्यांच्या वृंदावनात होता.
सन १९८० मध्ये हा बाण सातारकर छत्रपती राजमाता सुमित्राराजे यांच्याकडे आणला गेला.
या चंद्रशेखर बाणाला एक चंद्रकोरीच्या आकाराची रेखा आहे. शिवाय हा बाण शिवछत्रपतींच्या वापरातील म्हणून प्रख्यात झाला होता.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही या बाणाचे दर्शन घेतले आहे. आजही हा बाण जपून ठेवण्यात आला आहे.