Yashwant Kshirsagar
रेल्वे अपघातांमुळे होणाऱ्या जीवितहानीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रमुखतेने येतात. त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो – लोको पायलट गाडी का थांबवत नाही?
Railway Accident
esakal
रुळावर एखादी व्यक्ती किंवा प्राणी दिसल्यानंतरही लोको पायलट त्वरित ब्रेक का लावत नाही, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.
Railway Accident
esakal
मोटारसायकल किंवा कारला थांबण्यासाठी काही मीटरचे अंतर लागते. तसेच रेल्वेगाडीलाही थांबण्यासाठी मोठे ‘ब्रेकिंग डिस्टन्स’ लागते.
Railway Accident
esakal
९० ते १०० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या गाडीला थांबण्यासाठी किमान १ ते २ किलोमीटर आधीच ब्रेक लावावे लागतात.
Railway Accident
esakal
वेग जितका जास्त, ब्रेकिंग डिस्टन्स तितके जास्त. म्हणूनच अचानक थांबवणे शक्य होत नाही.
Railway Accident
esakal
लोको पायलटला रुळावर व्यक्ती दिसते, तेव्हा गाडीने आधीच आवश्यक ब्रेकिंग डिस्टन्स ओलांडलेले असते. त्यामुळे त्वरित थांबवणे अशक्य होते.
Railway Accident
esakal
रेल्वेगाडीच्या चाकांमध्ये आणि रुळांमध्ये प्रचंड बल (फोर्स) कार्यरत असते. गाडी थांबवण्यासाठीही प्रचंड बलाची गरज असते.
Railway Accident
esakal
काही सेकंदात गाडी अचानक थांबवणे अत्यंत कठीण असते. असे केल्यास प्रवाशांना गंभीर दुखापत होऊ शकते.
Railway Accident
esakal
अचानक जोरात ब्रेक लावल्यास गाडी रुळावरून घसरण्याची (डिरेलमेंट) शक्यता असते. त्यामुळे मोठ्या अपघाताचा धोका निर्माण होतो.
Railway Accident
esakal
लोको पायलट प्रवाशांच्या आणि गाडीच्या सुरक्षेचा विचार करूनच निर्णय घेतात. म्हणूनच रुळावर व्यक्ती दिसली तरी त्वरित थांबवणे शक्य होत नाही.
Railway Accident
esakal
Why Coconut Ban in Flight
esakal