सकाळ डिजिटल टीम
इंद्रधनुष्यात सातच रंग का असतात? काय आहे या मागचे विज्ञान जाणून घ्या.
Rainbow
sakal
सूर्याचा प्रकाश आपल्याला पांढरा दिसत असला तरी तो प्रत्यक्षात सात रंगांच्या मिश्रणाने बनलेला असतो. जेव्हा हा प्रकाश पावसाच्या थेंबातून जातो, तेव्हा त्याचे वेगवेगळ्या रंगांत विभाजन होते, यालाच 'विकिरण' म्हणतात.
Rainbow
sakal
पावसाचा प्रत्येक थेंब एका लहान 'काचेच्या लोलकासारखा' (Prism) काम करतो. जेव्हा सूर्यप्रकाश थेंबात शिरतो, तेव्हा थेंब त्या प्रकाशाला वाकवतो आणि त्याचे सात रंगांत विभाजन करतो.
Rainbow
sakal
इंद्रधनुष्य तयार होताना तीन प्रक्रिया घडतात: पहिल्यांदा प्रकाश थेंबात शिरताना वाकतो (Refraction), नंतर थेंबाच्या आतील भागातून तो आरपार न जाता मागे फिरतो (Internal Reflection) आणि बाहेर पडताना पुन्हा एकदा वाकतो.
Rainbow
sakal
इंद्रधनुष्यात रंगांचा क्रम नेहमी ठराविकच असतो: तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा (Indigo) आणि जांभळा. मराठीत याला लक्षात ठेवण्यासाठी ‘तानापिहिनिपाजा’ असे म्हणतात.
Rainbow
sakal
प्रत्येक रंगाची तरंगलांबी वेगवेगळी असते. तांबड्या रंगाची तरंगलांबी सर्वाधिक असल्याने तो सर्वात कमी वाकतो आणि वरच्या बाजूला दिसतो, तर जांभळ्या रंगाची तरंगलांबी कमी असल्याने तो सर्वाधिक वाकतो आणि खालच्या बाजूला दिसतो.
Rainbow
sakal
सुरुवातीला अनेकांना वाटायचे की पावसाचे थेंब पांढऱ्या प्रकाशाला 'रंगीत' करतात. मात्र, सर आयझॅक न्यूटन यांनी १६६६ मध्ये सिद्ध केले की, पांढऱ्या प्रकाशातच हे सात रंग आधीपासून अस्तित्वात असतात.
Rainbow
sakal
वास्तविक इंद्रधनुष्यात रंगांचा एक अखंड पट्टा असतो, ज्यात लाखो छटा असतात. परंतु, न्यूटन यांनी त्या काळातील ग्रीक विचारसरणी आणि संगीतातील सात सुरांशी (सा, रे, ग, म...) साधर्म्य राखण्यासाठी मुख्य सात रंगांची निवड केली.
Rainbow
sakal
कधीकधी एकाच वेळी दोन इंद्रधनुष्ये दिसतात. जेव्हा प्रकाश थेंबाच्या आत दोनदा परावर्तित होतो, तेव्हा दुसरे फिकट इंद्रधनुष्य तयार होते, ज्यात रंगांचा क्रम मूळ इंद्रधनुष्याच्या उलट असतो.
Rainbow
sakal
Peacock
sakal