बाळकृष्ण मधाळे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत असून प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Raja Shivaji Movie Shooting Locations
esakal
सुमारे 100 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा भव्यदिव्य चित्रपट केवळ कथानकासाठीच नव्हे, तर त्यातील वास्तवदर्शी लोकेशन्समुळेही चर्चेत आला आहे. चित्रपटातील विविध ऐतिहासिक स्थळांनी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले आहे.
Raja Shivaji Movie Shooting Locations
esakal
सुरुवातीला दाखवलेले काही महत्त्वाचे प्रसंग महाबळेश्वर येथील प्राचीन कृष्णाबाई मंदिरात चित्रित करण्यात आले आहेत. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले हे 13 व्या शतकातील मंदिर चित्रपटाच्या भव्यतेत भर घालते.
Raja Shivaji Movie Shooting Locations
esakal
याशिवाय, सातारा जिल्ह्यातील वाई परिसरातील प्रसिद्ध मेणवली घाटही चित्रपटात ठळकपणे दिसून येतो. कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या या घाटावर छ. शिवाजी महाराजांच्या बालपणाशी आणि त्यांच्या रणनीतीशी संबंधित काही महत्त्वाचे दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत.
Raja Shivaji Movie Shooting Locations
esakal
साताऱ्याजवळील संगम माहुली हे कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमासाठी ओळखले जाणारे पवित्र स्थळ आहे. चित्रपटातील अँथम गाण्याचे चित्रीकरण याच ठिकाणी करण्यात आले असून, या ठिकाणाच्या पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे दृश्यांना वेगळे आकर्षण प्राप्त झाले आहे.
Raja Shivaji Movie Shooting Locations
esakal
कोकण पट्ट्यातील समुद्रकिनारे आणि घनदाट जंगलांमध्येही काही महत्त्वाचे दृश्ये शूट करण्यात आली आहेत. विशेषतः संजय दत्त यांच्या पात्राशी संबंधित अॅक्शन दृश्यांचे चित्रीकरण कोकणातील जंगलांमध्ये पार पडले आहे.
Raja Shivaji Movie Shooting Locations
esakal
चित्रपटाचे चित्रीकरण पन्हाळगड आणि पावनखिंड यांसारख्या ऐतिहासिक ठिकाणीही करण्यात आले आहे.
Raja Shivaji Movie Shooting Locations
esakal
सुरक्षा कारणांमुळे आणि पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर प्रत्यक्ष शूटिंग न करता मुंबईतील फिल्मसिटीमध्ये त्याचा हुबेहूब सेट उभारण्यात आला. हा सेट 100 हून अधिक कारागिरांच्या मेहनतीने काही महिन्यांत तयार करण्यात आला.
Raja Shivaji Movie Shooting Locations
esakal
दरम्यान, दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या या चित्रपटाने पहिल्या सात दिवसांत तब्बल 57.9 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मीडिया अहवालानुसार, अशीच गती कायम राहिल्यास ‘राजा शिवाजी’ लवकरच 70 कोटींचा टप्पा पार करू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Raja Shivaji Movie Shooting Locations
esakal
Bhudargad Fort History
esakal